मार्केट कॅप (Market Capitalization) महत्त्वाचे का आहे ?

मार्केट कॅप (Market Capitalization) महत्त्वाचे का आहे ?
मार्केट कॅप (Market Capitalization) महत्त्वाचे का आहे  ? 
(WHY MARKET CAP IMPORTANT?)

Market Capitalization चे सूत्र म्हणजे शेअर्सच्या सध्याच्या किंमतींनी गुणाकार केलेल्या शेअर्सची एकूण संख्या. 

उदाहरणार्थ.  

शेअर्सची किंमत :- 
 एम. आर. एफ लिमिटेड :-  ६२,०००
बजाज फायनान्स लिमिटेड :- ३,२००

वरील शेअर किंमतीपासून आपण काय मिळवले ? तुमच्या मते कोणत्या स्टॉक चे बाजार भांडवल (Market Capitalization) मोठे आहे ?

लोक सहसा स्टॉक किंमतीला पाहतात आणि विचार करतात हा स्टॉक किती स्वस्त आहे किंवा हा स्टॉक किती महाग आहे परंतु वास्तविक मध्ये शेअर किंमत आणि बाजाराच्या भांडवलामध्ये काही संबंध नाही. परंतु प्रत्यक्षात शेअर किंमत ही एक संख्या आहे ज्यावर कंपनीचा तुकडा उपलब्ध आहे.

उदाहरणार्थ. 

Market capitalization of :- 

एम. आर. एफ लिमिटेड :- 
२६,००० (Crs.) 
बजाज फायनान्स लिमिटेड :-
९०,००० (Crs.) 

मार्केट कॅप (Market capitalization) v/s  एंटरप्राइझ मूल्य (Enterprise value).

Market capitalization आधीच वर स्पष्ट केले आहे. एंटरप्राइझ मूल्य म्हणजे बाजार भांडवल + कर्ज - रोख. एंटरप्राइझ मूल्य म्हणजे वास्तविक मूल्य ज्यावर कंपनी बाजारात विक्री करते.

मार्केट कॅप (Market capitalization)  v/s  मालमत्ता (assets). 

Market capitalization आधीच वर स्पष्ट केले आहे. मालमत्ता म्हणजे कंपनीच्या आढावा पत्रक(balance sheet)  वर असलेल्या चालू मालमत्ता ( current assets) आणि  चालू नसलेली मालमत्ता (noncurrent assets). त्यांच्यात नातं आहे. परंतु कर्ज, इक्विटी, इतर. या सारख्या इतर घटकां मुळे एकत्रितपणे बाजार भांडवल  (Market Capitalization) तयार होते.

जर एखाद्या गुंतवणूकदारांनी एखाद्या कंपनीचा तुकडा म्हणजे भाग खरेदी करताना बाजार भांडवलाच्या संदर्भात काही विचार केला असेल तर त्याचे नैसर्गिक लक्ष फक्त शेअर किंमतीत न जाता कंपनीच्या वास्तविक मूल्याकडे जाईल जेणेकरून तो इतर समभागांशी तुलना करू शकेल आणि ज्या गुंतवणूकीत आहे त्या कंपनीच्या उत्पन्न आणि नफ्याशी तुलना करू शकतो.

उदा.  Mr. Warren Buffett जे एक प्रसिद्ध गुंतवणूकदार आहेत ते महणतात जेव्हा आपण शेतजमीन खरेदी करतो तेव्हा आपल्याला नेहमी असे वाटते की आपण संपूर्ण शेतजमीन विकत घेत आहोत आणि फक्त एक तुकडाच नाही, पण कंपनीचा स्टॉक खरेदी करताना केवळ  शेअर्सची किंमतीबद्दल विचार करणे हे योग्य नाही.

माझा दुसरा ब्लॉग पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा :

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योग्यतेचे मंडळ (Circle of Competence) : Stock market for beginners in marathi.

५ प्रकारचे व्यवसाय जे मल्टीबॅगर असू शकतात - मोहनीश पबराई